Virat Ramayan Mandir: जगातील सर्वात मोठ्या मंदिरासाठी मुस्लिम कुटुंबाने 2.5 कोटी रुपयांची जमीन केली दान

0

दि.22: Virat Ramayan Mandir: देशातील सर्वच मुद्द्यांवर धार्मिक मतभेद असताना बिहारमध्ये जातीय सलोख्याचे उदाहरण घालून देणारी एक बातमी समोर आली आहे. येथे एका मुस्लिम (Muslim family) कुटुंबाने जगातील सर्वात मोठे मंदिर (world largest Hindu temple) बांधण्यासाठी आपली अडीच कोटी रुपयांची जमीन दान केली आहे. पूर्व चंपारणच्या कैथवालिया भागात जगातील सर्वात मोठे मंदिर विराट रामायण मंदिर (Virat Ramayan Mandir) बांधले जात आहे. पाटणाच्या महावीर मंदिर ट्रस्टचे प्रमुख आचार्य किशोर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. इश्तियाक अहमद खान यांनी ही जमीन दान करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ते पूर्व चंपारणचे असून गुवाहाटीमध्ये त्यांचा व्यवसाय आहे.

इश्तियाक यांनी मंदिराला जमीन दान करण्यासंबंधीची सर्व औपचारिकता नुकतीच पूर्ण केली. माजी आयपीएस अधिकारी कुणाल यांनी सांगितले की, पूर्व चंपारणच्या (East Chanmparan) उपविभाग केशरियाच्या रजिस्ट्रार कार्यालयात या औपचारिकता पूर्ण करण्यात आल्या. आचार्य म्हणाले की, इश्तियाक खान यांच्या कुटुंबाने दिलेली ही जमीन सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे उत्तम उदाहरण आहे. मुस्लिमांच्या सहकार्याशिवाय हा सुवर्ण प्रकल्प पूर्ण होणे कठीण झाले असते. महावीर मंदिर ट्रस्टने (Mahavir Mandir Trust) मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत 125 एकर जमीन संपादित केली आहे.

ट्रस्ट लवकरच आणखी 25 एकर जमीन संपादित करणार आहे.विराट रामायण मंदिर जगप्रसिद्ध आणि 12व्या शतकातील अंगकोर वाट मंदिरापेक्षा उंच असेल. अंगकोर वाट मंदिराची उंची 215 मीटर आहे. पूर्व चंपारणच्या संकुलात उंच शिखरांसह 18 मंदिरे असतील आणि येथील शिवमंदिरात जगातील सर्वात मोठे शिवलिंग असेल. या मंदिरासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च येणार आहे. नवी दिल्लीतील संसद भवनाच्या बांधकामात गुंतलेल्या अनेक नामवंत वास्तुविशारदांच्या मदतीने वास्तू लक्षात घेऊन डिझाईन तयार करून लवकरच मंदिराचे बांधकाम सुरू केले जाणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here