ॲड गुणरत्ने सदावर्ते यांच्यावर सोलापूरात गुन्हा दाखल

0

सोलापूर,दि.२०: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक व चप्पल फेक केल्यानंतर ॲड. गुणरत्ने सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच आहे. मुंबई, सातारा, कोल्हापूर, अकोल्यानंतर आता सोलापुरातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मराठा आरक्षणाच्या निकाला संदर्भात न्यायालयाच्या निकालाचा अवमान केल्याबद्दल आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्या प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात कलम १५३अ,ब, ५००,५०६,५०६,५०७ कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

तर सध्या कोल्हापूर पोलिसांना वकील गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा देण्यात आलेला आहे. कोल्हापूर शाहुपुरीत गुन्हा दाखल झाला असून, कोल्हापूर पोलीस आर्थर रोड कारागृहाकडे रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावरील एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्ल्याप्रकरणात गुणरत्न सदावर्तेंना अटक करण्यात आलेली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here