सोलापूर,दि.5: गुरूविद्या प्रतिष्ठानच्या वतीने बसव जयंतीचे औचित्य साधून चंडक मुनोत हॉस्पिटल पुर्व मंगळवार पेठ येथे बुधवारी सकाळी 9:00 वाजता मोफत कान,नाक, घसा, स्त्रीरोग तपासणी शिबिर संपन्न झाले. एकूण 127 लोकांना शिबिराचा फायदा झाला.
यावेळी व्यासपीठावर सिध्देश्वर सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष नरेंद्र गंभीरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ नारायणदास चंडक, डॉ गिरीष चंडक, डॉ राहुल चडंक, डॉ वासंती मुनोत यांची उपस्थिती होती. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा प्रभाकर नागणसुरे, उपाध्यक्षा राजश्री तडकासे, बसव उत्सव समिती अध्यक्षा रेणुका हब्बू, सचिवा श्रीदेवी यळमेली, संस्थापक अध्यक्ष सोमशेखर भोगडे, सल्लागार मोहन भूमकर, सदस्या अरूणा हणमगाव, सदस्य आनंद लिगाडे यांचीही उपस्थिती होती.
यावेळी नरेंद्र गंभीरे यांनी प्रतिष्ठानचे कार्याबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या. आभार मोहन भूमकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.