सोलापूर,दि.26: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना प्रिसिजन (Precision) ग्रुपने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बसमधुन (retrofitted electric bus) प्रवास केला.
या प्रवासादरम्यान प्रिसीजन उद्योग समुहाचे चेअरमन यतिन शहा यांनी त्यांना कंपनीच्या भविष्यातील योजना सांगीतल्या. प्रिसिजन कंपनीने भविष्यात इलेक्ट्रिक एलसीव्हीच्या २० लाखाहुन अधिक मोठ्या असलेल्या बाजार पेठेत प्रवेश करण्याची योजना आखली आहे. मध्यम ते कमी अंतरावरील डिलिव्हरीकरिता, कचरा वाहतुकीकरिता या वाहनांचा वापर होतो असेही सांगितले.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, “तुम्ही जे करत आहात त्याला “स्काय इज द लिमिट” आहे आणि सरकार भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या नवीन इलेक्ट्रिक वाहनांना पाठबळ देईल याची खात्री दिली. तसेच गडकरी यांनी या क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाचा उल्लेख करत प्रिसिजन ग्रुपला पाठपुरावा करण्यायोग्य काही नवीन मार्गही सुचवले.
प्रिसिजनने इलेक्ट्रिक बस तयार करताना 60 टक्क्याहून अधिक स्थानीय पार्ट्स वापरत केवळ 10 महिन्याच्या विक्रमी अल्प कालावधीत ही बस बनविल्याबद्दल मंत्र्यांनी प्रिसिजन टीमचे अभिनंदन केले.
या प्रवासात आमदार सुभाष देशमुख,प्रिसीजनचे कार्यकारी संचालक करण शहा, आ. सचिन कल्याणशेट्टी, विक्रम देशमुख, शाहजी पवार, प्रिसिजनची तांत्रिक टीमचे सदस्य उपस्थित होते.