कच्चा बदाम गाण्यावर माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुख यांनी केला डान्स

0

दि.31: अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अभिनेत्री रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांनी कच्चा बदाम (Kachcha Badam Song) गाण्यावर डान्स केला आहे. सोशल मीडियावर (Social Media) सध्या कच्चा बादाम (Kachcha Badam Song) हे गाणे धुमाकूळ घालत आहे. ठराविक कालावधीत काही गाणी अनेकांना भुरळ पाडतात. ‘कच्चा बादाम’ गाण्यावर (Kachcha Badam Song) पोलिसांनी भन्नाट डान्स केला होता. याचा व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. पोलीस कर्मचारी आपल्या गणवेशातच ‘कच्चा बादाम’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अभिनेता रितेश देशमुखचा (Ritesh Deshmukh) कच्चा बदाम गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडीओ माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ द फेम गेम या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. इथे रितेश आणि माधुरी डान्स करताना दिसत आहेत.

दरम्यान, माधुरी दीक्षितने ओटीटीवर पदार्पण केले आहे. द फेम गेम या चित्रपटातून माधुरीने ओटीटीवर वक्तव्य केले आहे. यात एका कलाकाराचे सगळ्यांसमोर असलेले आयुष्य आणि खरे आयुष्य कसे असते ते दाखवले आहे.

पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या भुबन बड्याकरने खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी ‘कच्चा बदाम’ हे गाणं तयार केलं होतं. पण त्याच्या या गाण्यावर आज सगळ्यांना नाचायला भाग पडेल याची कल्पना नव्हती. भुबन बड्याकरचे गाणे नंतर रिमिक्स केले गेले आणि YouTube वर अपलोड केले गेले. यावर या गाण्याला आतापर्यंत 109 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाली आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here