Ration-Aadhaar Link: केंद्र सरकारने केली मोठी घोषणा; रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी 

0

दि.27: Ration-Aadhaar Link: केंद्र सरकारने रेशन कार्ड (Ration Card) लाभार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने रेशन कार्ड (Ration Card) लाभार्थ्यांना आणखी एक मोठी संधी दिली आहे. सरकारने रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे. लाभार्थी आता 30 जून 2022 पर्यंत त्यांचं रेशन कार्ड आधारशी लिंक करू शकतील. तुम्ही अजून देखील जर तुमचं रेशन कार्ड आधारशी लिंक केले नसेल तर लगेचच करा. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिसूचना जारी करून ही माहिती दिली आहे. 

रेशन कार्डद्वारे कमी किंमतीत रेशन मिळण्यासोबतच आणखी अनेक फायदे मिळतात. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरू केली आहे. देशातील लाखो लोकांना या योजनेचा लाभ मिळत असून, रेशनकार्ड अंतर्गत अन्नधान्यासोबत इतर अनेक फायदे मिळतात. यासाठी तुम्ही आधार कार्ड रेशनकार्डशी लिंक करून ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेचा लाभ घेऊ शकता.

जर तुम्ही सरकारद्वारे दिल्या जाणारे मोफत धान्यासाठी पात्र असाल तर त्वरित रेशन कार्ड आणि आधार लिंक करणे गरजेचे आहे. आधार कार्डच्या मदतीने रेशन कार्डधारकांना त्वरित लाभ मिळतो. कोरोनानंतर सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ची सुरुवात केली असून, याद्वारे देशातील कोणत्याही भागात धान्य मिळेल.

अशा प्रकारे आधार कार्ड ऑनलाइन लिंक करा

यासाठी सर्वप्रथम 1. http://uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

2.आता तुम्ही ‘Start Now’ वर क्लिक करा.
3.आता येथे तुम्हाला तुमचा जिल्हा राज्याचा पत्ता भरावा लागेल.
4.यानंतर ‘रेशन कार्ड बेनिफिट’ या पर्यायावर क्लिक करा.
5.आता येथे तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक इत्यादी भरा.
6.ते भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
7.येथे OTP भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.
8.ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच, तुमचे आधार पडताळले जाईल आणि तुमचे आधार तुमच्या रेशनकार्डशी लिंक केले जाईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here