दि.6: Lata Mangeshkar Passes Away: सर्वांच्या लाडक्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले. लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्वात शांतता पसरली आहे. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) जवळपास महिनाभरापासून आजारी होत्या. 8 जानेवारी रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच क्रँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनिया झाला होता. लता दीदींचे वय पाहता डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले. तेव्हापासून त्या सतत संघर्ष करत होत्या.
लता मंगेशकर यांना कोरोना झाला होता
लता मंगेशकर गेल्या 27 दिवसांपासून आजारी होत्या. लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच क्रॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. लतादीदींना कोरोनासोबत न्यूमोनिया झाला होता. लता दीदींचे वय पाहता डॉक्टरांनी त्यांना थेट आयसीयूमध्ये दाखल केले. तेव्हापासून त्या सतत संघर्ष करत होती. या 27 दिवसांत त्यांना 2 दिवस व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा ढासळू लागताच लतादीदींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.
लता दीदींना 2001 साली संगीत क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दल ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांसह असंख्य पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. 1992 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारनं लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराचीही सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकरानंही 1984 सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. जी अविरत सुरू आहे. लता दीदींच्या आयुष्याचा प्रवास जरी आज थांबला असला तरी दैवी सूरांमधून व सुमधुर आवाजातून भारतीयांच्या अंतकरणात दीदींनी लावलेला स्नेहदीप सदैव चैतन्यानं युक्त राहील.