दि.3: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (Uttar Pradesh Assembly Elections) कार्यक्रम आटोपून दिल्लीला निघालेले AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या वाहनावर तीन-चार राऊंड गोळीबार करण्यात आला. स्वत: असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करून वाहनावर गोळीबार करण्यात आल्याचा दावा केला आहे.
ओवेसी यांनी ट्विट केले की, ‘काही वेळापूर्वी छिजारसी टोल गेटवर माझ्या कारवर गोळीबार करण्यात आला होता. 4 राऊंड गोळीबार करण्यात आला. तेथे 3-4 जण होते, सर्वजण शस्त्रे तेथेच सोडून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून तिथून निघालो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत अलहमदू ‘लिलाह.’
उत्तर प्रदेशात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. या निवडणुकीत ओवेसी याचा एमआयएम पक्षही उतरला असून ओवेसी यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. आज ते मेरठमधील किठौर येथे प्रचारासाठी आले होते. तेथील कार्यक्रम आटोपून ते दिल्लीकडे निघाले असतानाच त्यांना अज्ञात हल्लेखोरांनी लक्ष्य केले. ‘तीन ते चार हल्लेखोर होते.