Solapur: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याकरिता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आदेश

0

सोलापूर,दि.१: Solapur: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Discrict Collector Milind Shambharkar) यांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार त्या संबंधित आदेश काढले होते.

जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हीड- १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. ज्याअर्थी , ओमीयक्रॉन कोविड १९ व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने व पुढील काळात त्याचा प्रसार जास्त होण्याची शक्यता असल्याने शासनाकडील यापुर्वी दि. ३१.०१.२०२२ आदेशानुसार कोविड १९ विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध ( प्रतिबंध ) करण्यासाठी साथ रोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संपूर्ण राज्यात कडक निर्बंध जारी करण्याचे आदेशीत करण्यात आले आहेत.

तथापि लसीकरण झालेल्या प्रभावी कामकाजाच्या अनुषंगाने सदर निर्बंधामध्ये शासनाकडील दि. ३१.०१.२०२२ च्या आदेशान्वये अंशत: सुट देण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सोलापूर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ ( १ ) ( ३ ) व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार ओमीयक्रॉन कोरोना ( कोव्हिड -१९ ) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडील प्राप्त निर्देशास अनुसरून सोलापूर जिल्ह्यात ( पोलीस आयुक्तालय सोलापूर ची वगळून ) दि. ०१.०२.२०२२ चे रात्री ००.०० पासून खालीलप्रमाणे अंशतः निर्बंध शिथील करण्यात येत आहे.

अ ) ऑनलाईन तिकीटाची सुविधा उपलब्ध असलेले सर्व राष्ट्रीय उद्याने आणि सफारी नियमित वेळेनुसार खुली राहतील. तथापि सर्व अभ्यांगतांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील. तसेच कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता सदर ठिकाणावरील संबंधित नियंत्रण अधिकारी यांनी अशा ठिकाणी एका वेळेस भेट देणाऱ्या अभ्यांगतांची संख्यावर नियंत्रण ठेवणेकामी योग्य ते निबंध ठेवण्यात यावे.
ब ) ऑनलाईन तिकीटाची सुविधा उपलब्ध असलेले सर्व पर्यटन स्थळे नियमित वेळेनुसार खुली राहतील, तथापि सर्व अभ्यांगतांचे लसीकरण झालेले असणे आवश्यक राहील. तसेच कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेत ठिकाणावरील संबंधित नियंत्रण अधिकारी यांनी अशा ठिकाणी एका वेळेस भेट देणाऱ्या अभ्यांगतांची संख्यावर नियंत्रण ठेवणेकामी योग्य ते निबंध ठेवण्यात यावे.
क ) ब्युटी पार्लर व केश कर्तनालय यांना लागू केलेल्या निबंधाप्रमाणे स्पा सेंटर ५० % क्षमतेसह चालू राहतील.
ड ) अंत्यसंस्कार अंत्यविधीसाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवरील निर्बंध शिथील करण्यात येत आहे. वरील शिथील केलेल्या निर्बंधा व्यतिरिक्त इतर मुद्यांबाबत यापुर्वी दि.०९ .०१. २०२२ च्या आदेशान्वये लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा संघटना यांचेवर भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६० ) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ , साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचे विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here