सोलापूर,दि.27: सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण कोरोना चाचण्यांची संख्या कमी आहे. चाचण्यांची संख्या कमी असूनही रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरण झाल्याने नुकसान कमी होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला होता. केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण 1176 अहवाल प्राप्त झाले, यात 793 निगेटिव्ह तर 383 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 233 पुरुष व 150 महिलांचा समावेश आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3136 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 561 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 182044 झाली आहे. तर यापैकी 175214 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3694 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2400 पुरुष व 1294 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर 700 अहवाल प्राप्त झाले. यात 587 निगेटिव्ह तर 113 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 68 पुरुष व 45 महिलांचा समावेश आहे. एकही मृत्यू झाला नाही. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2244 आहे. काल बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 101 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 32634 झाली आहे. तर यापैकी 28907 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1483 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 947 पुरुष व 536 महिलांचा समावेश आहे.





