दि.21: Unique wedding ceremony: Wedding From Home: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांवर तसेच गर्दी जमवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. अशा काळात लग्न समारंभासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे लग्नास अनेकांना निमंत्रण देता येत नाही. कोरोना काळात लग्न समारंभासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. अनेक राज्यात लग्न समारंभास केवळ 50 जणच उपस्थितीत राहू शकतात. मात्र अशा काळात ही एक विवाह होत आहे.
या लग्न समारंभासाठी 450 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र असे असूनही या लग्नसमारंभात कोवीड निर्बंधाचे (Covid-19) तंतोतंत पालन करण्यात येणार आहे.
एक भारतीय जोडपे कोरोनामध्ये 450 पाहुण्यांसोबत लग्न करणार आहे. पण, विशेष गोष्ट अशी आहे की यामुळे कोणत्याही कोविड नियमाचे उल्लंघन होणार नाही. पश्चिम बंगालच्या संदीपन सरकार (Sandipan Sarkar) आणि अदिती दास (Aditi Das) यांनी हे विवाह करणार आहेत.
हेही वाचा Viral Photo: सांगा या फोटोत किती हत्ती दिसत आहेत? अनेकजण गेले गोंधळून
कोरोनामधील या अनोख्या लग्नाची बरीच चर्चा आहे. Google Meet च्या माध्यमातून पाहुणे या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. झोमॅटो वरून (Zomato) जेवणाची डिलिव्हरी अतिथीपर्यंत पोहोचेल. संदिपन सरकार यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच ते लग्नाचे नियोजन करत होते पण कोरोनामुळे ते पुढे ढकलण्यात आले.
कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासाठी त्यांनी गुगल मीटवर लग्नाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. पाहुण्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लग्नाचा लाईव्ह टेलिकास्ट पाहता येणार आहे. सर्वांना जेवण झोमॅटोद्वारे त्यांच्या घरी पोहोचवले जाणार आहे.
28 वर्षीय संदिपन सरकार यांनी सांगितले की, जेव्हा ते कोरोनामुळे 4 दिवस रुग्णालयात होते तेव्हा डिजिटल लग्नाची कल्पना त्यांच्या मनात आली. त्यामुळे सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेत त्यांनी मोठा कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला.
या लग्नाला 100 ते 120 पाहुणे प्रत्यक्ष उपस्थित राहतील तर 300 हून अधिक लोक याचे प्रसारण थेट पाहतील. लग्नाच्या एक दिवस आधी पाहुण्याला लग्न पाहण्यासाठी लिंक आणि पासवर्ड दिला जाईल. त्यात उपस्थित सर्व पाहुण्यांच्या घरी झोमॅटोवरून जेवण पोहोचेल.