सोलापूर,दि.४: सोलापूरमध्ये सध्या सोशल मीडियावर एक पोस्टर आणि पोस्ट अत्यंत वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामधून सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर प्रश्नांची मोठी सरबत्ती करण्यात आली आहे। “भारतीय संधीसाधू पक्षाचा ‘चो. उ. बों’ मोर्चा” आणि “चोराच्या उलट्या बोंबा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नांची द्याल का?” अशा अत्यंत आक्रमक भाषेतील हेडिंगसह हे पोस्टर प्रसिद्ध झाले आहे।
या व्हायरल पोस्टमध्ये “ही अराजकता कुणाची?” असा वारंवार सवाल करत भाजप सरकारच्या कार्यकाळातील अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर आणि घटनांवर बोट ठेवण्यात आले आहे। या पोस्टमध्ये खालील प्रमुख प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत:
राजकीय तोडफोड: आमदार आणि खासदार फोडणे, पक्षाचे चिन्ह चोरणे तसेच संविधानाचा गळा घोटणे ही अराजकता कुणाची?

धार्मिक आणि निवडणूक प्रकरणे: राम मंदिरात चोरी झाली आणि चोरांना वाऱ्यावर सोडले, तसेच मते चोरून आणि EVM मध्ये घोटाळे करून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप.
कायदा आणि सुव्यवस्था: दिवसाढवळ्या खून होणे, पोलीस ठाण्यांमध्ये गोळीबार होणे आणि वाढती गुन्हेगारी.

सामाजिक संघर्ष: आरक्षणाच्या नावाखाली जाती-जातींमध्ये संघर्ष पेटवणे आणि आक्रोस करणाऱ्या समाजटकांवर पोलिसांकडून लाठीमार करणे.
प्रशासन आणि अर्थव्यवस्था: परीक्षांचे पेपर फुटणे, मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडून जनतेची तिजोरी लुटली जाणे, झाडांची कत्तल करून उद्योगपतींना पोसणे आणि अवैध धंद्यांना संरक्षण देणे.

युवा वर्ग व दमन: तरुणाईचा आवाज दाबण्यासाठी लाठीचार्जचा वापर करणे आणि स्वतःच्या अपयशाचे खापर विरोधकांच्या डोक्यावर फोडणे.
पोस्टच्या शेवटी “एक संतप्त जागरूक नागरिक, सोलापूर” असे लिहिलेले आहे। या व्हायरल पोस्टमुळे सोलापूरसह राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, विरोधकांकडून या मुद्द्यांवरून सरकारला घेरले जात आहे.








