Home सोलापूर वार्ता बलिदान चौक तरुण मंडळाकडून २१ सप्टेंबरला मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

बलिदान चौक तरुण मंडळाकडून २१ सप्टेंबरला मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

0

सोलापूर,दि.१९: तुळजापूर वेस येथील बलिदान चौक तरुण मंडळ (दादा गणपती) तर्फे सोमवार, दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नगरेश्वर मंदिर, बलिदान चौक, तुळजापूर वेस, सोलापूर येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पार पडेल.

या शिबिरात कर्करोग, नेत्र, हृदयरोग (ईसीजी), दंत, रक्त, रक्तदाब (बीपी) यांसह इतर सर्वसाधारण आरोग्य तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.

नागरिकांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन बलिदान चौक तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिबिराचा तपशील:

 स्थळ: नगरेश्वर मंदिर, बलिदान चौक, तुळजापूर वेस, सोलापूर

 दिनांक: सोमवार, २१ सप्टेंबर २०२६

 वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.