Home महाराष्ट्र राज आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा: केंद्र सरकारवर जोरदार प्रहार

राज आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा: केंद्र सरकारवर जोरदार प्रहार

0
तिरंगा विजयी जल्लोष

मुंबई,दि.२६: नीट परीक्षा पेपरफुटीच्या तीव्र विरोधानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील वीर सावरकर मार्गावर भव्य ‘विजय जल्लोष सभा’ आयोजित करण्यात आली. या सभेला महाराष्ट्रभरातून हजारो नागरिक आणि विद्यार्थी हातात ध्वज घेऊन मोठ्या उत्साहाने उपस्थित राहिले होते.

सभेला संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “तुम्ही सर्वांनी देशभर पेटवलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. या आंदोलनाचा विजय आणि उत्साह साजरा करण्यासाठी आपण सर्व इथे जमलो आहोत. या देशातील ‘जेन-झेड’ (Gen-Z) म्हणजेच आजच्या तरुण पिढीने या सरकारच्या कारभाराची कशी पोलखोल केली, हेच या आंदोलनातून स्पष्ट झाले.”

पेपरफुटीमुळे प्राण गमावलेल्या २१ विद्यार्थ्यांचे स्मरण

भाषण दरम्यान राज ठाकरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील मुद्दा उपस्थित केला. देशभरातील विविध राज्यांतील २१ विद्यार्थ्यांनी या घोटाळ्यामुळे नैराश्यात येऊन आत्महत्या केल्याचे सांगत त्यांनी त्या सर्व मृत विद्यार्थ्यांची नावे वाचून दाखवली.

राज ठाकरे म्हणाले, “आपल्या आंदोलनाला यश आले असले आणि हा उत्साह साजरा करत असलो, तरी या भ्रष्ट व्यवस्थेमुळे प्राण गमावलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांचे दुःखात विस्मरण होता कामा नये.” त्यांनी उपस्थित जनसमुदायाला मृत विद्यार्थ्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी एक मिनिट शांत उभे राहून मौन पाळण्याचे आवाहन केले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सभेला मोठे यश

वास्तविक, नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी ठाकरे बंधूंनी मोर्चाचे आणि आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र, आंदोलनाच्या तीव्रतेमुळे धर्मेंद्र प्रधान यांनी काल अचानक राजीनामा दिला. या राजीनाम्यानंतर या मोर्चाचे रुपांतर एका भव्य विजय जल्लोष सभेत झाले.

या सभेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनीही उपस्थितांना आणि विशेषतः तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे आणि नीट आंदोलनाला मोठे यश मिळाल्यामुळे दादरमधील संपूर्ण परिसर कार्यकर्त्यांच्या उत्साहाने आणि घोषणाबाजीने दुमदुमून गेला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.