Dhanush-Aishwarya: रजनीकांतच्या मुलीचा घटस्फोट होणार, धनुष-ऐश्वर्या घटस्फोट घेणार

0

दि.१८: Dhanush-Aishwarya Separation: सुपरस्टार रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष घटस्फोट घेणार आहेत. काल रात्री ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष यांनी यासंबधी घोषणा केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी घटस्फोट घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तब्बल १८ वर्षांच्या दोघांच्या संसाराला ब्रेक लागला आहे.

रजनीकांतची मोठी मुलगी सौदर्या हिचाही २०१६ मध्ये घटस्फोट झाला होता. यानंतर तिने २०१९ मध्ये दुसरे लग्न केले होते. आता रजनीकांतची दुसरी मुलगी ऐश्वर्या ही तिच्या पतीपासून वेगळी होणार आहे. धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे. 

‘अठरा वर्षे आम्ही सोबत राहिलो. मित्र, जोडीदार, पालक, एकमेकांचे शुभचिंतक बनत एकमेकाला समजून घेत, एकत्रपणे आम्ही हा प्रवास केला. आता आम्ही ज्या टप्प्यावर आलो आहोत तिथून आमच्या दोघांच्याही वाटा वेगळ्या असतील. ऐश्वर्या आणि मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांपासून वेगळं होऊन स्वत:ला वेळ द्यावा आणि स्वत:ला धुंडाळावे असा मनोनिग्रह आम्ही केला आहे. आमच्या या निर्णयाचा आपण सन्मान कराल आणि या स्थितीतून पुढे जाण्यासाठी आवश्यक प्रायव्हसी आपण आम्हाला द्याल अशी आशा आहे’, अशा भावना धनुषने पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. ऐश्वर्यानेही अशाच प्रकारची पोस्ट ट्वीटरवर शेअर केली आहे. या बातमीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठा धमाका झाला आहे.

धनुषने १८ नोव्हेंबर २००४ रोजी अभिनेता रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न केले. धनुषचे लग्न झाले तेव्हा तो फक्त २३ वर्षांचा होता. दोघांची पहिली भेट २००३ मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. धनुष आणि ऐश्वर्याला यत्र आणि लिंगा नावाची दोन मुले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here