सोलापूर,दि.25 : देशात जेव्हा आतंकवाद उफाळून आला त्यावेळी त्या आतंकवादाविरूध्द आवाज उठवणारी अहले हदीस ही पहिली मुस्लीम संघटना असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना असगरअली इमाम महदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विविध उपक्रमाचा शुभारंभ आणि संघटनेतील सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूरला आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
देशातच नव्हे तर जगात सर्व धर्मसमभाव आहे. मानवता हाच धर्म असला पाहिजे, आतंकवाद, अपहरण, दशतवाद यासारखे कृत्य आम्हाला मान्य नाहीत ईस्लाम मध्ये याचा तिव्र शब्दात निषेध केला आहे. याच तत्वावर अहले हदिस या संघटनेचे कार्य सुरू आहे. माणसामधील राक्षसामुळेच वादावादी निर्माण होते ती नष्ट झाली पाहिजे. असे विचार घेवून आम्ही वाटचाल करीत आहोत. असेही मौलाना असगर अली इमाम महदी यांनी सांगितले. सोलापूर मध्ये काही आमच्याच बांधवांमध्ये गैरसमज झालेला आहे ते नाराज झाले असतील तर त्यांना समजावून परत आमच्या संघटनेत बोलावून घेवू परंतु त्यांनी दुसरी संघटना काढून काही कृत्य करू नये असेही त्यांनी सांगितले.
देशहित आणि जनतेसाठी काम करणाऱ्यांचा आम्ही सदैव पाठीशी राहणार आहोत. तसेच राजकीय किंवा निवडणुकांमध्ये आमच्या संघटनेकडून काहीच मदत केली जात नाही. संघटनेतील काहीजणांना निवडणुक लढवायची असेल तर त्यांनी वैयक्तिक पातळीवर लढवावी संघटना त्यांना काही बोलणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.प्रत्येकाने त्याच्या पातळीवर देशासाठी आणि जनतेसाठी चांगले काम करून जगात आपल्या भारत देशाचे नाव उज्वल करावे असेही मौलाना असगर अली यांनी सांगितले. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी सोलापूर मधील अहले हदीस संघटनेचे निवडून आलेले पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यापत्रकार परिषदेला अहले हदीस महाराष्ट्र राज्य प्रभारी अध्यक्ष वकील परवेझ, खजिनदार हनिफ इनामदार, सचिव सर्फराज असरी, सहसचिव शेख अजमतुल्ला तर सोलापूर शहर अध्यक्ष महिबुब मुजावर, उपाध्यक्ष मौलाना सर्फराज मोहम्मद असरी, इ्नबाल शेख, सचिव मौलाना अब्दुल रजाक मोहम्मदी, सहसचिव वारीस कुडले, इ्नबाल दलाल, फिजौद्दीन आबादीराजे, खजिनदार अब्दुल खालीद मन्सूर आदी उपस्थित होते.