Vaishno Devi Shrine Stampede: वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी; 12 भाविकांचा मृत्यू

0

Vaishno Devi Shrine Stampede: वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक भाविक जखमी झाले आहेत.

जम्मू,दि.1जानेवारी 2022: लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वैष्णोदेवी मंदिरात (Vaishno Devi Shrine Stampede) नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत 12 भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.  तर  20 हून अधिक भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींना देवस्थानच्या नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

नव्या वर्षाचे स्वागत देवदर्शनानं करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी गर्दी झाली होती. यावेळी वैष्णो देवी मंदिर भवन परिसरात शनिवारी पहाटे 2.45 वाजता चेंगराचेंगरी झाली. यात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहेत. तसेच, चेंगराचेंगरीची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले.

सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रियासी येथील नियंत्रण कक्षाने सांगितले की, कटरा येथील माता वैष्णो देवी भवनात झालेल्या चेंगराचेंगरीत लोक जखमी झाल्याचे वृत्त असून सध्या बचावकार्य सुरू आहे. चेंगराचेंगरीनंतर प्रशासन आणि व्यवस्थापनाने पुढील आदेशापर्यंत यात्रा स्थगित केली आहे.

वैष्णोदेवी मंदिरातील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान निधीतून मृतांच्या नातलगांना प्रत्येकी 2 लाख रुपये व जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचीही घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. तसेच, या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here