दि.28: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूरमध्ये लोकायुक्त डीएसपी वेदांत शर्मा यांच्या शेजाऱ्याला घर बांधणे महागात पडले. शेजारच्या बांधकामाधीन घराची धूळ डीएसपीच्या गाडीवर उडाली म्हणून, लोकायुक्त डीएसपीने अर्धनग्न अवस्थेत शेजाऱ्याला लाथा-बुक्के मारण्यास सुरुवात केली. शेजारच्या घरमालकाने जीव वाचवून पळ काढला तेव्हा डीएसपी साहेब अर्धनग्न अवस्थेत काठीने त्याच्या मागे धावले. ही संपूर्ण घटना बाजूच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.
ही घटना इंदूरच्या लक्ष्य विहार कॉलनीची आहे, जिथे बँक कर्मचारी असलेले संदीप विज त्यांच्या घर क्रमांक 51 मधील घरात बांधकाम करत होते. लोकायुक्त डीएसपी वेदांत शर्मा त्यांच्या घराशेजारच्या घरात राहतात, ते उज्जैनमध्ये तैनात आहेत. वेदांत शर्मा यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या कारवर धूळ पडली होती, यावर डीएसपींनी आधी संदीप विज यांना शिवीगाळ केली, नंतर मारहाण केली.
संदीप विज वेदांत शर्माशी बोलत असताना डीएसपी रागात आले आणि त्यांनी संदीप विज यांच्याशी बाचाबाची सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही कॉलनीच्या मधल्या रस्त्यावर एकमेकांशी बाचाबाची करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. जीव वाचवून संदीप विज पळू लागले तेव्हा शर्मा यांनी घरातून काठी आणली आणि त्याला मारण्यासाठी धावले.
डीएसपी वेदांत शर्मा यांच्या तक्रारीनंतर कानडीया पोलीस ठाण्याचे प्रभारी जगदीश जमरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. संदीप विज यांचीही तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, संदीप विज यांच्या घरात 6 महिन्यांपासून काम सुरू होते, त्यामुळे त्यांच्या घराजवळ बांधकामाचा मलबा टाकला जात असल्याचे वेदांत सांगतात. डीएसपी यांनी अनेकवेळा संदीपला मलबा साफ करण्यास सांगितले, त्यानंतर त्याने गैरवर्तन आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.