PM Modi-CM Yogi : डाळी,मीठ आणि तेलाच्या पाकिटांवर मोदी-योगींचे फोटो, गरिबांना मोफत रेशनचे केले जात आहे वाटप

0

उत्तर प्रदेशात रेशन दुकानातून (Ration Shop) गरिबांना डाळी, मीठ आणि तेलाची मोफत पाकिटे (free pulses, salt-oil packets) वाटली जात आहेत.

PM Modi-CM Yogi : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) रेशन दुकानातून (Ration Shop) गरिबांना डाळी, मीठ आणि तेलाची मोफत पाकिटे (free pulses, salt-oil packets) वाटली जात आहेत. या पॅकेट्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नाथ (PM Modi-CM Yogi) यांचे फोटो आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत. राज्यातील सुमारे 80 हजार रेशन दुकानांमधून या वस्तूंचे वितरण केले जात आहे. यामध्ये मोदी आणि योगींच्या फोटोंसोबत विचार प्रामाणिक-काम मजबूत असा नाराही लिहिला आहे. रेशनच्या दुकानांमधून मीठ, शुद्ध तेल आणि हरभरा पॅकेट (free pulses, salt-oil packets) वितरित केले जात आहेत. त्यावर पीएम मोदी आणि योगी आदित्यनाथ यांचे फोटो आहेत. राज्यातील मोफत रेशन योजनेंतर्गत (free ration scheme) या वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.

20 दिवसांपूर्वी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) मार्च 2022 पर्यंत वाढवल्याची घोषणा केली होती. गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या काळात ही योजना सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत सर्व लाभार्थ्यांना 5 किलो मोफत रेशन देखील दिले जात आहे.

अशा परिस्थितीत योगी सरकारने एक पाऊल पुढे जात केंद्राच्या मोफत रेशन योजनेंतर्गत सर्व लाभार्थ्यांना एक किलो डाळ, मीठ आणि हरभरा दाळ, देण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीमधील सर्व ठिकाणच्या रेशन दुकानांमधून या वस्तूंचे वितरण करण्यात आले असून त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

यूपी सरकारच्या म्हणण्यानुसार, मार्च 2022 पर्यंत ही पॅकेट 15 कोटी लाभार्थ्यांना दिली जातील. मात्र, दोन महिन्यांनी यूपीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाने शनिवारी ट्विटरवर याला दुहेरी रेशन योजना म्हटले आणि दुहेरी इंजिनच्या सरकारशी जोडले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here