कसं काय शेलार बरं हाय का?– तमाशातल्या नाच्या सारखा शिमगा केला?

0

मुंबई,दि.12: भाजप नेते आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांच्याबद्दल केलेल्या कथित वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयासमोर मध्यरात्री काही अज्ञातांनी आक्षेपार्ह पोस्टर लावले आहेत. त्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून वाद सुरु झाला आहे. त्यातच आता शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला असून आशिष शेलारांविरुद्ध बॅनरबाजी केली आहे. या बॅनरबाजीवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेनेनं केलेल्या बॅनरबाजीमध्ये आशिष शेलार यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आशिष शेलार यांच्या संदर्भात जी पोस्टरबाजी झाली ती मी पाहिली नाही. तसंच पुढे त्यांनी म्हटलं की, जेव्हा दोन नेत्यांचा वाद होत असतो तेव्हा इतर जण याचा गैरफायदा घेत असतात. त्यामुळे हे नक्की कोणी केलंय हे तपासायला हवं. शिवसैनिकांनी केलं असतं तर ते नावानिशी केलं असतं, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेची आक्रमक बॅनरबाजी

शिवसेनेनं आक्रमकपणे आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारं बॅनर थेट मुंबईत नरीमन पाँईट येथील भाजप प्रदेश कार्यालया समोरच लावलं आहे. या बॅनरवर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांना तमाशातील नाच्याच्या भूमिकेत दाखवण्यात आलंय. त्याखाली आशिष शेलार यांची खिल्ली उडवणारी टिकाही करण्यात आलीय.

अशी उडवली खिल्ली

‘कसं काय शेलार बरं हाय का?

काल काय एैकलं ते खरं हाय का ?

काल म्हणं तूम्ही, किशोरी ताईंचा अपमान केला

तमाशातल्या नाच्या सारखा शिमगा केला?

आशिष शेलारांविरोधात गुन्हा दाखल

महापौर किशोरी पेडणेकर (Mayou Kishori Pednekar) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. किशोरी पेडणेकर यांनी स्वत: मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात शेलारांविरोधात तक्रार केली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here