व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ संदर्भात PIBFactCheck ने सांगितले व्हिडीओत केला जाणारा दावा खोटा आहे
Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र काही व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे अनेक लोकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. असाच एक व्हिडिओ (Video) समाजमाध्यमावर (On social media) व्हायरल होत आहे. 500 च्या नोटेसंबंधी एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे.
सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये 500 च्या नोटेमधील फरक सांगण्यात आलं असून यातील एक नोट खरी (True Note) आणि दुसरी बनावट (Fake Note) असल्याचं सांगण्यात आलं आहे. या व्हिडीओमुळे अनेक लोकांमध्ये गैरसमज (Misunderstanding) निर्माण होण्याची शक्यता आहे.
व्हिडीओत करण्यात आलेला दावा चुकीचा
या व्हिडीओत (Viral Video) सांगण्यात आलं आहे की, 500 ची अशी कोणताही नोट घेऊ नका ज्यामध्ये हिरवी पट्टी (Green Bar) आरबीय गव्हर्नरच्या (RBI Governor) स्वाक्षरीजवळ नसून महात्मा गांधींच्या फोटोजवळ (Photo of Mahatma Gandhi) आहे. महात्मा गांधींच्या फोटोजवळ हिरवी पट्टी (Green Bar) असणारी नोट खोटी असल्याचा दावा या व्हिडीओत करण्यात आला आहे.
लोकांची दिशाभूल करण्यासाठी व्हिडीओत दोन्ही नोटा दाखवण्यात आल्या आहेत. मात्र हा व्हिडीओ बनावट आहे. आरबीआयनुसार, 500 च्या दोन्ही नोटा वैध आहेत. याचाच अर्थ हिरवी पट्टी आरबीआय गव्हर्नरच्या स्वाक्षरीजवळ आहे ती नोट आणि गांधींच्या फोटोजवळ हिरवी पट्टी असणारी नोट अशा दोन्ही नोटा खऱ्या आहेत.
PIBFactCheck ने आरबीआयच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नोटा खऱ्या असून त्यांना मान्यता आहे. यामुळे लोकांनी या व्हिडीओला बळी पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारने 2016 मध्ये नोटाबंदी केल्यानंतर 500 च्या नव्या नोटा बाजारात आणण्यात आल्या.