अनेकांना काल्पनिक कथा आवडतात. मनोरंजनाच्या हेतूने अनेक जण काल्पनिक कथा आवडीने वाचतात. काल्पनिक कथा बऱ्याचवेळा जादूवर आधारित असतात.’अलाद्दिनची’ (Aladdin) कथाही अनेकांनी वाचली असेल. काल्पनिक कथा आवडणाऱ्यांना सोशल मीडियावर व्हायरल होणार हा व्हिडीओ पाहायला आवडेल. शेकडो वर्षं झाली तरी अजूनही अरेबियन नाइट्स या जगप्रसिद्ध ग्रंथातल्या अनेक गोष्टींची मोहिनी कायम आहे. आतापर्यंत तुम्ही गोष्टींमध्ये ऐकलेला अलाद्दिन प्रत्यक्ष पहायला मिळतोय, हे वाचून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. दुबईमध्ये सध्या अलाद्दिन अवतरला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
गर्दीच्या ठिकाणी रस्त्यावर ट्रॅफिकमधून फिरताना आणि तुमच्या दारातून जाताना, तुम्हाला नमस्कार म्हणताना, तुम्हाला अलाद्दिन (Aladdin) भेटणं किंवा त्याला प्रत्यक्ष पाहणं हे तुमच्यासाठी नक्कीच रोमांचकारक असेल. ‘चाळीस चोर’ कुठे लपले आहेत याची खात्री नसली तरी दुबईच्या लँडस्केपमध्ये तुम्ही हा देखणा अलाद्दिन पाहू शकता.
तुम्हाला यावर विश्वास ठेवणं अवघड होईल. परंतु दुबईच्या जमिनीवर आणि पाण्यातून प्रवास करताना कॅमेऱ्यात टिपलेल्या या तरुण आणि तितकाच मोहक अलाद्दिनचा (Aladdin) व्हायरल व्हिडीओ पाहून हे सत्य तुमचे डोळे नाकारू शकत नाहीत. हा व्हिडीओ एकदा पाहिला की तो वारंवार पाहण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही.