Social Media Viral: सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होतात. यात बरेचसे व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात. सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. प्राण्यांची व्हिडिओ अनेकजण पाहतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत शेळी सरकारी कागदपत्रे घेऊन पसार होताना दिसून येत आहे.
व्हिडीओत दिसणारी शेळी सरकारी कार्यालयातील कागदपत्रे घेऊन पळून जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील कानपूरचा असल्याचं समजतं आहे. जो एका सरकारी कार्यालयाचा आहे. खरं तर प्रकरण असे आहे की, सरकारी कार्यालयात एक बकरी घुसली आणि तिथून फाईल तोंडात दाबून पळली. बकरी तोंडात फाईल धरून बाहेर कशी उभी आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तेवढ्यात कार्यालयातील एक कर्मचारी ती फाईल घेण्यासाठी धावत येतो, मात्र त्याला पाहताच शेळी पळून जाते.
फाईल तोंडात धरुन शेळी कशी धावत आहे आणि फाईल आणण्यासाठी कर्मचारी त्याच्या मागे धावत आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो बकऱ्याच्या मागे लांबपर्यंत धावतो, पण शेळी फाईल देण्याचे नाव घेत नाही. जणू बऱ्याच वर्षांनंतर शेळीला अशी एखादी वस्तू सापडली आहे, ज्याची तिला खूप गरज होती आणि ती गोष्ट कोणालाही देऊ इच्छित नाही.