मुंबई: EPFO Recruitment 2026: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) रोजगाराची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ईपीएफओने ‘लोअर डिव्हिजन क्लर्क’ (LDC) आणि ‘कनिष्ठ सचिवालय सहाय्यक’ (JSA) या पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, देशातील २३ क्षेत्रांमधील एकूण १५३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पात्रता आणि वयोमर्यादा | EPFO Recruitment 2026:
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान दहावी (मॅट्रिक्युलेशन) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रतेसोबतच इतर विहित अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार EPFOच्या अधिकृत वेबसाइटवर http://epfindia.gov.in जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
महत्त्वाच्या तारखा
• अर्ज भरण्यास सुरुवात: २३ मार्च २०२६
• अर्ज करण्याची अंतिम तारीख: १ एप्रिल २०२६
• संभाव्य परीक्षा दिनांक: २ मे २०२६
निवड प्रक्रिया आणि पगार
उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा, शॉर्टलिस्टिंग आणि कागदपत्र पडताळणी या माध्यमातून केली जाईल. या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना १८,००० ते ५६,९०० रुपयांपर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज कसा करावा?
इच्छुक उमेदवारांनी ‘EPFO’ च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जात सर्व वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अर्ज सबमिट करण्यापूर्वी तो पुन्हा तपासून घ्यावा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.
अधिक सविस्तर माहिती आणि अटींसाठी उमेदवारांनी ईपीएफओच्या अधिकृत जाहिरातीचा संदर्भ घ्यावा.







