नाना काळे यांचा उल्लेख करत नगरसेवक अमोल शिंदे यांचे मोठे वक्तव्य 

0

सोलापूर,दि.१८: सोलापूर शिवसेना (शिंदे गट) जिल्हा प्रमुख नगरसेवक अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी माजी उपमहापौर पद्माकर उर्फ नाना काळे (Padmakar Kale) यांचा उल्लेख करत मोठे वक्तव्य केले आहे. प्रभाग क्रमांक ७ मध्ये नाना काळे (Nana Kale) यांना भाजपने उमेदवारी दिली होती. अमोल शिंदे आणि नाना काळे यांच्यात लढत झाली आणि अमोल शिंदे विजयी झाले. नाना काळे यांचा पराभव झाला. सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपचे ८७ उमेदवार विजयी झाले आहेत. (Amol Shinde On Nana Kale)

काय म्हणाले अमोल शिंदे? Amol Shinde On Padmakar Kale

भाजपने सोलापूर महापालिकेत पद्माकर उर्फ नाना काळे यांना स्वीकृत सदस्य केले तर त्याचे स्वागतच आहे. तसे झाले तर त्यांचा पहिला सत्कार आपणच करणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. काळे यांना भाजपकडून स्वीकृत सदस्यपद देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. 

शिंदे म्हणाले, भाजपने काळे यांना संधी दिली तर स्वागतच आहे. ते स्वीकृत सदस्य झाल्यास पहिला सत्कार आपण करणार आहोत. काळे यांना स्वीकृत सदस्य केल्यास मराठा समाजाला न्याय मिळणार आहे. महापालिका निवडणुकीत भाजपने नाना काळे यांचा वापर करून घेतला. माणसांचा वापर करून घेण्यात कोठे परिवार पटाईत आहे. हे लक्षात घेता नाना काळे यांना स्वीकृत सदस्यपद  मिळणार का? याबाबत २० फेब्रुवारीलाच खरे  चित्र स्पष्ट होईल, असेही  शिंदे म्हणाले.

कोठे यांचा स्वभाव पाहता ते काळे यांना नगरसेवक करतील, असे आपल्याला वाटत नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नाना काळे नगरसेवक झाल्यास प्रभाग क्रमांक सात मधील नगरसेवकांच्या संख्येत भर पडणार आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच विकास कामांसाठी त्याचा फायदा होईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here