सोलापूर,दि.३१: सोलापूर महानगरपालिका भाजपा गटनेता म्हणून नरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपचे ८७ उमेदवार विजयी झाले आहेत. महापालिकेच्या १०२ जागांवर भाजपने उमेदवार दिले होते. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. गटनेता म्हणून कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
गटनेता म्हणून काळे यांची निवड झाली आहे, आता महापौर पदासाठी कोणाला संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महापौर पदासाठी नगरसेवक डॅा. किरण देशमुख, विनायक कोंड्याल तसेच अनंत जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. कोंड्याल हे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत तर डॅा. किरण देशमुख हे आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र आहेत.








