मुंबई,दि.२९: विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. महाराष्ट्रातील बारामती येथे लँडिंग करताना अजित पवार यांचे विमान कोसळले, त्यात पवारांसह ६ जणांचा मृत्यू झाला. अनेकांनी अजित पवारांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केले.
अजित पवार यांचे अकाली निधन संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेदना देणारी घटना ठरली. राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर भाष्य केलं आहे. “आता सत्य बोलावंच लागेल, महापालिका निवडणूकीनंतर एकत्र येऊ असं अजित पवार म्हणाले होते, बैठकाही झाल्या. अजितदादा हे शरद पवारांकडे बघुनच म्हणत होते. आता त्यादृष्टीनंच आमची वाटचाल होईल,” असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. अजित पवार यांनीही एका जाहीर सभेत आम्ही एकत्र आल्यावर इतरांच्या पोटात का दुखतं? असा प्रश्न विचारला होता.
दोन्ही राष्ट्रवादी एक व्हावी
अजित दादांमध्ये जिद्द होती. मेहनत घ्यायचेअलिकडच्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूका लढवाव्यात अशी चर्चा झाली. अनेक प्रसंग असेत की विसरता येणार नाहीत. माझ्या वेषभूषेबद्दल ते कायम टिप्पण्णी करायचे. दोन्ही पक्ष एकत्र येऊन आपण पुन्हा एकसंघ व्हावे ही दादांची इच्छा होती, त्याच्या बैठकाही नुकत्याच झाल्याचेही जयंत पाटलांनी यावेळी सांगितले.








