सोलापूर,दि.१६ सोलापूर महापालिकेच्या १०२ जागांसाठी मतदान झाले होते. मतमोजणीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. भाजपाचे उमेदवार ६२ जागांवर विजयी झाले आहेत तर एका जागेवर काँग्रेस उमेदवार नरसिंह आसादे विजयी झाले आहेत. तर १ जागेवर शिंदे शिवसेना उमेदवार विजयी झाला आहे. तर AIMIM चे चार उमेदवार विजयी झाले आहेत.
भाजपाने २६ प्रभागात सर्वच जागांवर उमेदवार उभे केले होते. अनेक प्रभागातील लढतींकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपचे बिज्जू प्रधाने हे प्रभाग क्रमांक ५ ड मधून विजयी झाले आहेत. ५ अ समाधान आवळे, ५ क मंदाकिनी तोडकरी, ५ ब अलका भवर हे विजयी झाले आहेत.
प्रभाग क्रमांक ६ मधील गणेश वानकर पिछाडीवर तर मनोज शेजवाल आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक २४ मधून नरेंद्र काळे यांच्यासह भाजपा पॅनल विजयी झाले आहे. प्रभाग क्रमांक २६ मधून भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. यात जयकुमार माने हे माजी आमदार दिलीप माने यांचे बंधू आहेत.
प्रभाग क्रमांक १४ मधील एमआयएमचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक २० मधून एमआयएमचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.








