सोलापूर शहरात आतापर्यंत ५२९८१८ जणांचे लसीकरण पूर्ण
सोलापूर,दि.२२ : सोलापूर शहर नवीन ३ रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या २९२६३ झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या २७८०३ झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या १७ आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या १४४३ झाली आहे. यात ९२५ पुरुष व ५१८ महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज ८०४ अहवाल प्राप्त झाले. यात ८०१ निगेटिव्ह तर ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ० पुरुष आणि ३ महिलांचा समावेश आहे. आज एकही जणांची नोंद मृत म्हणून नाही. तर एकाही रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला नाही.