बेंगळुरू-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात ७ ठार

0
बेंगळुरू-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात ७ ठार

सोलापूर,१४: Bengaluru-Mumbai Expressway Accident: बेंगळुरू-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघातात ७ ठार झाले आहेत. बेंगळुरू-मुंबई महामार्गावर कात्रज बोगद्यापुढे नवले पुलाजवळ ब्रेक निकामी होऊन भरधाव मालवाहू ट्रकने तीव्र उतारावर एक ते दीड किमी परिसरात १५ ते १६ वाहनांना धडक दिल्यानंतर वाहनांनी पेट घेतल्याने झालेल्या भीषण अपघातात चिमुरडीसह सात जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये दोन महिला चार पुरुष एक चिमुरडीचा समावेश आहे.

गुरुवारी सांयकाळी साडेसह सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन ट्रकच्या मधोमध एक कार अडकल्याने कारमधील प्रवाशांचा होरपळून दुर्देवीरित्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात २० ते २५  जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता, की त्यात ट्रक पेट घेतल्याने लागलेल्या आगीत चालक जळून जागीच खाक झाला. तर वाहने बाहेर काढण्यासाठी कटर व क्रेनचा वापर करावा लागला. दरम्यान, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बेंगळूर-मुंबई द्रुतगती मार्गावरील वारजे येथील नवले पूल कायम गजबजलेला असतो. सायंकाळच्या  सुमारास या भागात वाहनांची प्रचंड गर्दी असते. शनिवारी, रविवारी तसेच औद्योगिक सुटीच्या दिवशी म्हणजे गुरुवारीही येथे मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर आलेली असतात. गुरुवारी सायंकाळीही नवले पुलाच्या परिसरात वाहनांची मोठी गर्दी होती. याच  सुमारास राजस्थानची  पासिंग असलेला एक ट्रक सातार्‍याहून मुंबईच्या दिशेने जात असताना नवले पुलाजवळ तीव्र उतारावर गाडीचे  ब्रेक फेल झाले. त्यामुळे वाहनचालकाचे ट्रकवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले.

त्यानंतर भरधाव ट्रकने एकामागोमाग एक पुढील वाहनांना धडका देण्यास सुरुवात केली. त्यात अनेक वाहने चिरडली गेली. त्यात दोन ट्रकच्या मध्ये एक कार सापडली. त्यात वाहनांनी अचानक पेट घेतला. त्यामुळे त्यात अनेकांचे बळी गेला. अपघातग्रस्त कारमधून प्रथम दोन महिला व एका मुलीचा आणि दोन पुरुषांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनाकरिता ससून रूग्णालयात पाठविण्यात आले.

अपघातानंतर अग्नीशामक दलाची वाहने व जवान मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहने जागेवरुन हटविण्यासाठी कटर व क्रेनचा वापर करावा लागला. नऊ ते दहा रुग्णवाहिकादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. अग्नीशामक दलाच्या जवानांनी सुरुवातीला जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह कंटेनरमधून बाहेर काढला. त्यानंतर बचाव कार्य गतीने सुरू करण्यात आले व एकेक मृतदेह बाहेर काढण्यात आला.

ब्रेक निकामी झाल्याने अपघात | Bengaluru-Mumbai Expressway Accident

पोलीस उपायुक्त संभाजी पाटील म्हणाले, या अपघातात सहा ते सात जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना खासगी रुiणालयात हलविण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. जवळपास २० ते २५ जण यात जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त ट्रकचे ब्रेक निकामी झाले आणि या ट्रकने समोरील वाहनांना धडक दिली.

सीएनजी कारमुळे आगीचा  भडका

त्यानंतर एका ट्रकला धडकताना त्याच्यामध्ये एक सीएनजी कार अडकून तिचा चेंदामेंदा होऊन तीला भीषण आग लागली. ज्या वाहनांना आग लागली, ती नंतर शमविण्यात आली. अपघातानंतर वाहतूक सुरळित करण्याचे काम पोलिसांकडून हाती घेण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here