Solapur Heavy Rain: सोलापुरात पावसाचा कहर, ढगफुटी सदृश्य पाऊस

0

सोलापूर,दि.११: Solapur Heavy Rain: सोलापुरात पावसाने कहर केला आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. गेल्या 24 तासांमध्ये सोलापुरात 118.3 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर शहरात मुसळधार पाऊस कोसळला. या मुसळधार पावसाने सोलापूर शहरात हाहाकार माजवला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. (Solapur Rain)

सोलापूर शहर व परिसरात रात्रभर विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील व ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. तुफान पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Solapur Heavy Rain

सोलापूर शहरातील मुख्य रस्ते, विशेषतः सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील पंजवानी मार्केटसमोर महामार्गांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. सर्व्हिस रोडने प्रवास करणाऱ्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचे पाहायला मिळाले.

रात्रीच्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुना विडी घरकुल, मित्र नगर, शेळगी या भागांमध्ये पाणी घरात घुसल्याने स्थानिक नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक घरांमध्ये 2-3 फूटपर्यंत पाणी घुसल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

सोलापुरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शहरातही हाहाकार उडवला आहे. शहरातील अनेक भाग जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विडी घरकुल, दहिटणे, शेळगी आणि अक्कलकोट रोड परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या भागांतील अनेक घरांत पाणी शिरल्यामुळे नागरिकांना रात्रभर जागून घरातील साहित्य वाचवण्यासाठी धडपड करावी लागली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here