IPS अंजना कृष्णा प्रकरण आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली दिलगिरी 

0

सोलापूर,दि.७: MLA Amol Mitkari Expressed His Regret राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिलगिरी व्यक्त करत IPS अंजना कृष्णा  (IPS Anjana Krishna) यांच्या विरोधात केलेली चौकशीची मागणी मागे घेतली आहे. अवैध वाळू उत्खनन थांबवण्यासाठी पोलिसांसह डीएसपी अंजना कृष्णा माढा तालुक्यातील कुर्डू गावात पोहोचल्या होत्या. सोलापूरमध्ये डीएसपी म्हणून तैनात असलेल्या अंजना कृष्णा बेकायदेशीर उत्खनन थांबवण्यासाठी पोहोचल्या होत्या तेव्हा ही घटना घडली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने अजित पवारांना फोन केला. त्यानंतर त्या कार्यकर्त्याने तो फोन अंजना कृष्णा यांना दिला. अजित पवारांनी कारवाई करेन असे महिला अधिकाऱ्यांना सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) चौकशी करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित व्हायरल व्हिडिओ वादानंतर ही मागणी करण्यात आली आहे. मिटकरी यांनी ५ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील यूपीएससी सचिवांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याचीच चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली दिलगिरी |  MLA Amol Mitkari Expressed His Regret

आमदार अमोल मिटकरी यांनी आयपीएस अंजना कृष्णा यांच्या शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याबाबत मिटकरी यांनी युपीएससीला एक पत्र लिहिले होते. हे पत्र त्यांनी ट्विट केले होते. दरम्यान, आता त्यांनी हे ट्विट मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे.

सोलापुर घटने संदर्भात केलेला ट्वीट मी बिनशर्थ मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो.ही माझ्या पक्षाची भुमिका नव्हती तर माझी वैक्तिक भुमिका होती .आपले पोलिस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भुमिकेशी पूर्णपणे सहमत आहे. असे मिटकरी यांनी ट्टीटमध्ये म्हटले आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here