Teacher: दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षिका व्हिडीओ कॉल करुन…

0

मुंबई,दि.३०: Teacher Video Call To Students: शिक्षिका आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिक्षिका (Teacher) आणि विद्यार्थ्यांचे (Students) नाते हे गुरू शिष्याचे असते. मात्र या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. नवी मुंबईतील एक शिक्षिका विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडीओ कॉल करुन उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा हादरवून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. ZEE मिडीयाने याबाबत वृत्त दिले आहे. 

शिक्षिका विद्यार्थ्यांना व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे करायची. व्हिडीओ कॉलवरून अश्लील चाळे दाखवत एक शिक्षिका विद्यार्थ्यांना उत्तेजित करत असल्याचा प्रकार समोर आल्याने कोपरखैरणेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला. या शिक्षिकेला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. एका विद्यार्थ्यासोबतच तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

कोपरखैरणेतील एका शाळेतील शिक्षिकेचे आक्षेपार्ह कृत्य समोर आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारी ही 35 वर्षीय शिक्षिका तिच्याच वर्गातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांना उत्तेजित करत होती. यासाठी ती स्वतःचे अर्धनग्न फोटो, व्हिडीओ त्यांना इन्स्टाग्रामवर पाठवत होती. त्याशिवाय व्हिडीओ कॉल करून अश्लील कृत्य करायची. मागील बऱ्याच दिवसांपासून हा सारा प्रकार सुरु होता.

मात्र, या शिक्षिकेचा एका विद्यार्थ्यासोबत केलेल्या अश्लील चाळ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे हा प्रकार पालकांच्या व पोलिसांच्या निदर्शनात आला. तेव्हा तिच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर तिला अटक करण्यात आली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here