गृहमंत्री अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर शरद पवार असलेला फोटो व्हायरल

0

राष्ट्रवादीने केला व्हायरल फोटोचा पर्दाफाश

मुंबई,दि.27: महाराष्ट्रातील (Maharashtra) महाविकास आघाडीचं सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल (दि.26) केला होता. महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. येत्या मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल. आता सर्व काही ठीक होईल, असे नारायण राणे यांनी जयपूरमध्ये म्हटले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शुक्रवारी (दि.26) जयपूर दौऱ्यावर होते.

राज्यातील सरकार पडणार असल्याच्या अफवा व्हायरल झाल्या होत्या. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली. पण, शहा आणि फडणवीस यांच्या भेटीच्या फोटो मार्फ (Photo Morph) करून शरद पवार (Sharad Pawar) सुद्धा बैठकीला हजर असल्याचा फोटो व्हायरल करण्यात आला. राष्ट्रवादीने (NCP) यावर आक्षेप हा फोटो बनावट असून फोटोशॉप केला असल्याचं उघड केलं आहे.

काल (दि.26) देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा फोटो समोर आला. पण, अचानक एक फोटो व्हायरल झाला. यामध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार सुद्धा या बैठकीला उपस्थितीत होते, असं या फोटोतून दाखवण्यात आलं.

व्हायरल होणाऱ्या फोटोचा राष्ट्रवादीने पर्दाफाश केला आहे. ‘अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या ‘गजाल्या’ सुरू झाल्यात. त्यासाठी ‘असले’ मार्फ केलेले बचकांडे हातखंडे आहे, असं राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

‘आता मॉर्फला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. महाराष्ट्र सायबर पोलीस असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे’ अशी विनंती सुद्धा राष्ट्रवादीने सायबर पोलिसांकडे केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here