Rahul Gandhi | राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत केला हा आरोप

0
Rahul Gandhi | राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत केला हा आरोप

मुंबई,दि.२४: Rahul Gandhi On Assembly Election | लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहे. या निवडणुकीत गडबड घोटाळा झाल्याचे त्यांनी आकडेवारीवरून दाखवून दिले आहे. आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील आकडेवारी वरून ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक प्रक्रियेत गडबड घोटाळा होत असतानाही निवडणूक आयोग गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी? | Rahul Gandhi On Assembly Election

सोशल मिडीयावर पोस्ट करत राहुल यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. गांधी यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात, मतदार यादीत फक्त 5 महिन्यांत 8% वाढ झाली. तर काही बूथवर 20 ते 25 % वाढ झाली. तसेच बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे नोंदवले. पडताळणी केलेल्या पत्त्याशिवाय हजारो मतदारांना उघड केले. असे सर्व सुरू असनाना निवडणूक आयोग गप्प आहे की यात सहभागी आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. (Rahul Gandhi On Election Commission)

Rahul Gandhi On Assembly Election

ही घटना म्हणजे ही मत चोरी आहे आणि अशा घटना लपवणे ही कबुली आहे. हे सर्व उघड करण्यासाठीच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतो, असेही त्यांनी म्हटले आहे. याआधीही राहुल गांधी यांनी महाराष्ट्रील निवडणुकीबाबतचे घोटाळे आकडेवारीसह उघड केले होते. आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतचोरीही उघड केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here