Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान 

0
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

पुणे,दि.२२: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Shetakari Karjmafi) यांनी मोठे विधान केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (२१ जून) पुणे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून एक भव्य भक्ति योगाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान | Devendra Fadnavis On Shetakari Karjmafi

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या (Shetakari Karjmafi) संदर्भात सरकारने दिलेला एकही शब्द फिरवला जाणार नाही. कर्जमाफी कधी करायची याबाबत काही नियम आणि पद्धती आहेत. “उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल,” असे ठोस आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.  

Devendra Fadnavis On Shetakari Karjmafi

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सरकार ठाम

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निर्णयाबाबत विचारले असता, फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या संदर्भात सरकारने दिलेला एकही शब्द फिरवला जाणार नाही. कर्जमाफी कधी करायची याबाबत काही नियम आणि पद्धती आहेत. “उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल,” असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. निवडणुकीच्या काळात महायुतीमधील अनेक नेत्यांनी शब्द दिला होता, तो शब्द फिरवला आहे का, या प्रश्नावर त्यांनी “रोज थोडी उत्तरं द्यायची असतात” असे म्हणत सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे संकेत दिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here