Vaishnavi Hagawane Death | वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण, अजित पवार यांचे मोठे वक्तव्य 

0
Ajit Pawar ON Vaishnavi Hagawane Death

बारामती,दि.२२: Ajit Pawar ON Vaishnavi Hagawane Death | वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) मृत्यू प्रकरण, अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. वैष्णवी हगवणे यांना सासरच्या मंडळींनी अतोनात त्रास दिल्याचे माहिती समोर येत आहे. सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. मात्र त्यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली याबद्दल चर्चा सुरू आहे. हगवणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे तालुका प्रमुख आहेत. ( Vaishnavi Hagawane Death Case)

वैष्णवी हगवणे यांच्या विवाह सोहळ्यात अजित पवार उपस्थित होते. “एखाद्या लग्नाला गेलो आणि नंतर त्याच्या सुनेने वेडेवाकडे केलं तर त्याचा अजित पवार काय संबंध?” असा सवाल पवार यांनी उपस्थित केला आहे. तसेच हगवणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे. 

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे हे वैष्णवीचे सासरे होते. त्यांच्यावर सुनेचा छळ केल्याचा आरोप आहे. अजित पवारांचे काही जुने फोटो व्हायरल झाले असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी रोखठोकपणे आपली भूमिका आज बारामती दौऱ्यादरम्यान केलेल्या भाषणामध्ये मांडली. 

Ajit Pawar ON Vaishnavi Hagawane Death

वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अटक केली आहे. सासरा राजेंद्र हगवणे फरार आहे. 

काय म्हणाले अजित पवार? | Ajit Pawar ON Vaishnavi Hagawane Death

असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार असल्याचे अजित पवारांनी बारामतीत बोलताना सांगितले आहे. पवार म्हणाले, मी ही घटना घडल्याची माहिती कळल्यावर पिंपरीच्या सीपींना फोन केला. आणि सांगितलं की, कोणी का असेना कारवाई करा. ज्या मुलीने आत्महत्या केली, तिचा नवरा, सासू, नणंद सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. सासरा पळून गेला. तो पण सापडेल, पळून पळून जातो कुठं? असं म्हणत राजेंद्र हगवणे याला इशारा दिला आहे. 

वैष्णवीच्या लग्नामध्ये हगवणे कुटुंबाला भेट म्हणून देण्यात आलेल्या फॉर्च्युनर कारची चावी अजित पवारांच्या हस्ते देण्यात आल्याचा फोटो व्हायरल झाला असून या फोटोसंदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या फोटोवरुन मनसेनंही अजित पवारांवर टीका केली असल्याने अजित पवारांनी विरोधकांना उत्तर दिलं. 

“मला सांगितले गाडीची चावी द्यायला सांगितली. मी देता ना पण विचारले, ही खुशाीन् घेताय की बळजबरीने. आजून ते टीव्हीला आहे. मी कोणाचा मिंदा नाही,” असे अजित पवार म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here