सोलापूर,दि.१२: Maharashtra SSC Result 2025 | उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (MSBSHSE) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. दहावीच्या निकालाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. (Maharashtra SSC Result 2025 Marathi News)
Maharashtra SSC Result 2025 | उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल
यंदाच्या वर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. आता उद्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. १३ मे रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

बोर्डाचे सचिव देविदास कुलाळ यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रकामध्ये, “फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेच्या निकालाबाबत” अशा मथळ्याखाली सविस्तर माहिती देण्यात आली आहे. “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल मंगळवार, दिनांक 13 मे, 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे,” अशी घोषणा पत्रातून बोर्डाने केली आहे.
येथे पाहता येणार निकाल | SSC Result 2025
महाराष्ट्र बोर्डाचा 10 वी चा (SSC) निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाइट्स वापरू शकता: