श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाची वाटचाल कौतुकास्पद : उपायुक्त धनराज पांडे

0

सोलापूर,दि.25: सोलापूर बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाची धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला – क्रीडा क्षेत्रातील वाटचाल कौतुकास्पद असल्याचे मत सोलापूर महानगर पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी व्यक्त केले.

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या श्री मंदिरास सदिच्छा भेटी प्रसंगी ते बोलत होते. मंडळ केवळ गणेशोत्सव पुरता मर्यादित न राहता शेतकरी संघटना, महिला मंडळाच्या माध्यमातून कार्यरत आहे. मंडळाचे सामाजिक कार्य गौरवास्पद आहे. सदिच्छा भेटी प्रसंगी उपायुक्त धनराज पांडे यांचा मंडळाचे जेष्ठ विश्वस्त रामचंद्र जोशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार, श्री फोटो देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, उपाध्यक्ष प्रकाश वाले, केदार मेंगाणे, शिवशंकर कोळकुर, बाळासाहेब भोगडे, मल्लिनाथ खुने, गुरुलिंग समाणे, ऑर्किड कॉलेजचे प्रा. डॉ. श्रीनिवास मेंतन, संजय दर्गोपाटील, सोमनाथ मेंगाणे, शिवानंद बुगडे, अनिल मसरे, बीप्पीन धुम्मा, जगदीश हिरेहब्बु, सूरज गुंगे, योगिराज भोगडे, स्वप्निल दसाडे, योगेश इंडी, संदीप कुरडे, स्वप्निल सोलंनकर, जीवन जोशी, केदार कुताटे, संदीप जोशी, गुरु पटणे, संजय बिराजदार आदी उपस्थित होते.

या प्रसंगी मंडळाचे उत्सव अध्यक्ष पुष्कराज मेत्री यांनी समाज घटकासह प्रशासकीय अधिकारी वर्गाकडून मंडळाच्या कार्याबद्दल मिळणारी कौतुकाची थाप मंडळाच्या कार्यकारणीसह शेकडो सदस्यांचा ऊस्ताह वाढविणारा आहे. या पुढे ही आपण सामाजिक कार्यात गतिशील रित्या कार्यरत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here