भोपाळ,दि.८: आमिषे दाखवून किंवा बळजबरीने धर्मांतर करायला लावणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षेची घोषणा मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मध्य प्रदेशात लोकांचे धर्मांतर करुन घेणाऱ्यांना मृत्युदंड दिला जाईल. राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (Mohan Yadav) यांनी याची घोषणा केली आहे. मोहन यादव म्हणाले, “धार्मिक स्वातंत्र्य कायद्याद्वारे, आम्ही अशी तरतूद करत आहोत की आमचे सरकार धर्मांतर करणाऱ्यांना फाशी देईल.
ते पुढे म्हणाले की, सरकारने कोणत्याही प्रकारच्या धर्मांतर आणि गैरवर्तनाविरुद्ध संकल्प केला आहे की आपण आपल्या समाजात या वाईट गोष्टींना प्रोत्साहन देणार नाही. निष्पाप मुलींच्या छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये सरकार खूप कडक आहे, म्हणूनच मृत्युदंडाची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, “आमचे सरकार बळजबरीने किंवा लोकांना आमिष दाखवून दुष्कृत्य करणाऱ्यांना सोडणार नाही. आम्ही अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत जगण्याचा अधिकार देऊ इच्छित नाही.”