सोलापूर,दि.18: छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. यानिमित्ताने केंद्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यामध्ये “जय शिवाजी जय भारत” पदयात्रा राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे तरी या पदयात्रेत सर्व सोलापूरकर नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधारण संवाद
केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा ते अकरा या कालावधीत नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता ते रंगभवन उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळयापर्यंत हजारो विद्यार्थी, नागरिक यांची जय शिवाजी जय भारत पदयात्रा आयोजित करण्यात आलेली आहे. प्रारंभी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या यात्रेनिमित्त हजारो विद्यार्थी, नागरिक अधिकारी, कर्मचारी यांच्याशी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सकाळी 9.30 वाजता संवाद साधणार आहेत. त्यानंतर सकाळी दहा वाजता पदयात्रा शुभारंभ होईल. तरी सोलापूरकर नागरिकांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.