सोलापूर,दि.12: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील ग्रंथालयांच्या प्रलंबित मागणी संदर्भात बैठक आयोजित करावी यासाठी आमदार सुधीर दादा गाडगीळ, आमदार सत्यजित तांबे व आमदार अभिमन्यू पवार यांना महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते.
त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती या बैठकीस आमदार अभिमन्यू पवार महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे, माजी सहाय्यक ग्रंथालय संचालक श्याम दाइंगडे, बालाजी कांगणे, सिद्राम मुद्देबिहाळ , निलेश क्षिरसागर, प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, महेश सोनजे, प्रताप सुर्यवंशी, संजय ढेरे, राम मोतीपिवळे आदी उपस्थित होते.

या बैठकीत राज्यातील 11,150 ग्रंथालयाच्या अनुदान 40% वाढ, दर्जा बदल व नवीन 2000 ग्रंथालय मान्यता देणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बैठकीत सांगितलं तसेच या चळवळीत फुकटचे श्रेय लाटणारे भरपूर जण असल्याचे सदाशिव बेडगे म्हणाले.