सोलापूर,दि.1: अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली आहे. सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे. १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. सीतारामन म्हणाल्या की, गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या भल्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. शेतीची वाढ, ग्रामीण विकास आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. आर्थिक क्षेत्रातील सुधारणांकडेही लक्ष देणार आहे. 100 जिल्ह्यांमध्ये धनधान्य योजना सुरू करण्यात येत आहे. तसेच किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपये झाली आहे.
राज्यांना मिळून 1.5 लाख कोटींची रक्कम 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज म्हणून दिली जाणार, विविध योजनांवर , पायाभूत सुविधांवर खर्च करण्यासाठी ही रक्कम दिली जाणार
सगळ्या सरकारी उच्च माध्यमिक शाळांना ब्रॉडबँड सुविधा मिळणार
डिजिटल पुस्तके उपलब्ध केली जाणार
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 10 हजार जागा वाढवणार
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पुढील 5 वर्षात अतिरिक्त 75 हजार जागा उपलब्ध होणार
यावर्षी 200 कॅन्सर केअर डे केअर सेंटर सुरू करणार
कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) प्रशिक्षणासाठी उत्कृष्टता केंद्रं स्थापन करणार, त्यासाठी 500 कोटी खर्चाची तरतूद करणार