सोलापूर,दि.13: माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. दिलीप माने यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. माने हे काडादी यांच्याबरोबर नंदूर गावात प्रचारात सहभागी झाले आहेत. माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत काडादी यांना पाठिंबा जाहीर केला होता.
माने यांच्या डोळ्याचे अॅापरेशन झाल्याने ते प्रचारात सहभागी होऊ शकले नव्हते. मात्र आता माने यांनी प्रचार सुरू केला आहे. यामुळे काडादी यांच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. दिलीप माने यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. दिलीप माने हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र माने यांनी या सर्व अफवा असल्याचे सिद्ध केले आहे.