राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर 

0

मुंबई,दि.24: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाने आज त्यांच्या पहिली यादीची घोषणा केली आहे. 44 उमेदवारांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.  अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटप संदर्भात बैठका सुरूच आहेत.

शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या वतीने पहिल्या यादीत 44 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत भाजपामधून काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या तीन नेत्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. काही दिवसापूर्वी कागल येथील भाजपामधून समरजीत घाटगे, दोन दिवसापूर्वी बेलापूरमधील संदीप नाईक तर इंदापूर येथील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता, या तीन नेत्यांना आता खासदार शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे. 

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून महेश कोठे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपा आमदार विजयकुमार देशमुख आणि महेश कोठे यांच्यात लढत होणार आहे. जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत उमेदवारी यादी वाचून दाखवली आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना (UBT) मध्ये जागांवरून ताणाताणी सुरू असताना शरद पवार यांनी मात्र संयमी भूमिका घेत त्यांची रणनीती आखली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here