मुंबई,दि.12: महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी तब्बल 12 उमेदवार रिंगणात उतरले होते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान झाले आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने आमचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा केला जात आहे.
अखेर भाजप नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या आमदार झाल्या आहेत. पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी विजयासाठी आवश्यक कोट्यापेक्षा जास्त मते घेऊन विजय मिळवला आहे. पंकजा मुंडे विजयी झाल्याने वरळीपासून परळीपर्यंत जल्लोष करण्यात येत आहे.
भाजपचे पाच उमेदवार विजयी
विधान परिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, सदाभाऊ खोत विजयी झाले आहेत.
अजित पवार गटाचे दोन्ही उमेदवार विजयी
अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे २३ मतांनी आणि शिवाजीराव गर्जे हे २४ मतांनी विजयी झाले आहेत.
महायुतीचे ९ उमेदवार विजयी
विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे सदाभाऊ खोत यांनी दुसऱ्या पसंतीची अधिक मतं घेऊन विजय मिळवला आहे.
भावना गवळी २४ मतं मिळवत विजयी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भावना गवळी यांना २४ मतं मिळाली असून त्या विजयी झाल्या आहेत.
काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. प्रज्ञा सातव यांनी २३ मतांचा कोटा पूर्ण केला आणि विजय मिळवला.
मिलिंद नार्वेकर
ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे विजयी झाले आहे. तर शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे.