लोकसभा निवडणुकीनंतरच्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक माहिती आली समोर

0

सोलापूर,दि.14: सीएसडीएसच्या (CSDS) लोकनीतीने लोकसभा निवडणुकीनंतर सर्वेक्षण केले आहे. यामध्ये जनतेच्या मतदान पद्धतीवर चर्चा करण्यात आली. या सर्वेक्षणात 19 हजार 663 लोकांचा समावेश करण्यात आला होता. देशातील 23 राज्यांतील 191 लोकसभा मतदारसंघात हे लोक पसरले असून या सर्वेक्षणात 18 हजार 393 लोकांनी भाग घेतला आणि मतदान केले. तर 1270 लोकांना विविध कारणांमुळे मतदान करता आले नाही.

कोणाला मत द्यायचे कधी ठरवले?

मतदान करणाऱ्यांना विचारण्यात आले की, तुम्ही कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे हे कधी ठरवले? या प्रश्नाच्या उत्तरात 2591 लोकांनी मतदानाच्या दिवशीच मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले, तर 2465 जणांनी एक-दोन दिवस आधी मतदान कोणाला करायचा याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. उमेदवाराच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्याला मत देण्याचा निर्णय 3809 जणांनी घेतल्याचे सांगितले. त्याचबरोबर सर्वाधिक पाच हजार 59 जणांनी उमेदवाराचे नाव जाहीर होण्यापूर्वीच मतदान करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या लोकांपैकी 669 लोकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

मतदाराने काय पाहून मतदान केले?

मतदान करणाऱ्यांना विचारले असता, त्यांनी कोणत्या आधारावर उमेदवाराला मतदान केले, तेव्हा सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या 9170 लोकांनी पक्षाच्या नावावर मतदान केल्याचे सांगितले. 6664 लोकांनी पंतप्रधानांचा चेहरा पाहून मतदान केल्याचे सांगितले, तर यातील 155 जणांनी इतर कारणांसाठी मतदान केल्याचे सांगितले तर 641 लोकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here