Indresh Kumar: ‘जे अहंकारी झाले आहेत त्यांना 241 वर थांबवण्यात आले आहे, जे राम विरोधी…’ RSS नेते इंद्रेश कुमार

0

जयपूर,दि.14: RSS नेते इंद्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी भाजपा आणि इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्याकरिता बहुमत मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी सत्ताधारी भाजपला ‘अहंकारी’ आणि विरोधी इंडिया ब्लॉकला ‘रामविरोधी’ म्हटले आहे. (Indresh Kumar On BJP)

काय म्हणाले RSS नेते इंद्रेश कुमार? | Indresh Kumar On Lok Sabha Result

इंद्रेश कुमार म्हणाले, राम सर्वांना न्याय देतो. 2024 च्या लोकसभा निवडणुका बघा. ज्यांनी रामाची पूजा केली, पण हळूहळू त्यांच्यात अहंकार निर्माण झाला. त्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष बनवला. पण त्याला जे पूर्ण अधिकार मिळायला हवे होते, जे सामर्थ्य मिळायला हवे होते ते देवाने त्याच्या अहंकारामुळे दिले नाही. 

इंद्रेश कुमार पुढे म्हणाले की, रामाला विरोध करणाऱ्यांना कोणतीही सत्ता दिली नाही. त्यांच्यापैकी कुणालाही सत्ता दिली नाही. एकत्र येऊनही ते नंबर-1 बनले नाहीत. क्रमांक-2 वर उभे राहिले. म्हणून देवाचा न्याय विचित्र नाही खरे आहे. हे खूप आनंददायक आहे. (Indresh Kumar On India Bloc)

गुरुवारी इंद्रेश कुमार जयपूरजवळील कानोटा येथे ‘रामरथ अयोध्या यात्रा दर्शन पूजन सोहळ्याला’ संबोधित करत होते. इंद्रेश हो आरएसएसचा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यही आहेत. मात्र, त्यांनी आपल्या संबोधनात कोणत्याही पक्षाचे नाव घेतले नाही. पण त्याचा हावभाव व इशारा स्पष्टपणे दर्शवत होता.

भाजपचा उल्लेख करताना इंद्रेश म्हणाले, ज्या पक्षाची (भगवान रामाची) भक्ती होती, पण अहंकारी झाला, तो 241 वर थांबला, पण सर्वात मोठा पक्ष बनवण्यात आला. ते म्हणाले, स्पष्टपणे इंडिया आघाडीचा उल्लेख करत, ज्यांचा रामावर विश्वास नव्हता, त्यांना एकत्रितपणे 234 वर थांबवण्यात आले. ते पुढे म्हणाले, लोकशाहीत रामराज्याचे संविधान बघा, ज्यांनी रामाची पूजा केली पण हळूहळू अहंकारी झाला, तो पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, पण त्यांना जी मते आणि सत्ता मिळायला हवी होती, ती त्यांच्या अहंकारामुळे देवाने बंद केली. 

ते म्हणाले, रामाला विरोध करणाऱ्यांपैकी कोणालाही सत्ता दिली नाही. अगदी सगळ्यांना मिळून नंबर टू करण्यात आले. देवाचा न्याय खरा आणि आनंददायक आहे. ते म्हणाले, जे रामाची पूजा करतात त्यांनी नम्र असले पाहिजे आणि जे रामाला विरोध करतात, त्यांच्याशी देव स्वतः व्यवहार करतो.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here