सोलापूर,दि.23: Congress On Voting Data: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या अंतिम आणि पाचव्या टप्प्याचे मतदान झाले. उर्वरित देशात अजून दोन टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांत जे मतदान झाले त्याचा रीयल टाइम डेटा आणि त्यानंतर जी अंतिम आकडेवारी याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
काँग्रेसचे प्रश्न | Congress On Voting Data
एक म्हणजे अंतिम आकडेवारी जाहीर करण्यासाठी 11 ते 12 दिवसांचा उशीर का झाला आणि दुसरे म्हणजे मतदानाचा रीयल टाइम डेटा आणि अंतिम आकडेवारी यात जवळपास 380 जागांवर तब्बल 1 कोटी 7 लाखांचा फरक आहे. त्याचे कारण काय, असा सवाल करत काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले, पहिल्यांदाच असे घडल्यामुळे लोकांच्या मनात निवडणूक प्रक्रियेबद्दलच संशय निर्माण झाला आहे. हा संशय दूर करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. संपूर्ण देशात प्रत्येक मतदाराला याबाबत चिंता वाटते. त्यामुळे आम्ही वारंवार मतदानाच्या आकडेवारीबाबत प्रश्न उपस्थित करत आहोत. मिसिंग ईव्हीएम कुठे आहेत, असा सवालही त्यांनी विचारला.