मराठा सेवा संघाचा आंबेडकर जयंतीनिमित्त स्तुत्य उपक्रम

0

सोलापूर,दि.15: उन्हाळ्याची चाहूल लागली असून, या दिवसात पक्षी पाण्यासाठी वणवण हिंडत असतात. त्यामुळे मराठा सेवा संघाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त जिल्हा परिषद आवारातील बागेत पक्षासाठी पाण्याची सोय केली आहे. तसेच काँक्रीटच्या जंगलामध्ये चिमन्यांना घर करणे शक्य नाही. यासाठी कृत्रीम घरटे तयार केले आहेत आणि आपणही आपल्या घरी कृत्रीम घरटे तयार करावे म्हणजे चिमन्या वास्तव्यास येतील असा संदेश दिला.

यामुळे जिल्हा परिषद आवारात पक्षांचा आवाज घुमणार आहे. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषदच्या वतीने पक्षांना पाण्याची सोय करणेत आली आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, समाज कत्याण अधिकारी प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता सुनिल कटकधोंड, संतोष कुलकर्णी, संजय पारसे, मराठा सेवा संघ जि प शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे, कॅस्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, कर्मचारी महासंघ राज्य सहसचिव दिनेश बनसोडे, सुधाकर माने देशमुख, नागेश धोत्रे, चेतन भोसले, श्रीकांत मेहेरकर, राजेंद्र काकडे, प्रविण वाघमारे, संदिप खरबस, ज्योत्सा साठे, सैपन जमादार आदि मराठा सेवा संघाचे सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाबाबत पक्षीप्रेमी नागरीकांनी कौतुक केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here